मी फुलपाखरू झालो तर निबंध – mi fulpakharu zalo tar nibandh

मी फुलपाखरू झालो तर निबंध – mi fulpakharu zalo tar nibandh

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आज आपण एका वेगळ्या विषयावरती निबंध लिहिणार आहोत. निबंधाचे नाव आहे मी फुलपाखरू झालो तर, खरंच एखादा स्वप्न असल्यासारखं वाटत असेल ना !

मी फुलपाखरू झालो तर निबंध - mi fulpakharu zalo tar nibandh
मी फुलपाखरू झालो तर निबंध – mi fulpakharu zalo tar nibandh

मी फुलपाखरू झालो तर मराठी निबंध – mi fulpakharu zalo tar marathi nibandh
Me fulpakhru jhalo tar – मी फुलपाखरू झालो तर

जर आपण फुलपाखरू झालो तर काय होऊ शकत ? या कल्पनेवर आपल्याला हा निबंध लिहावयाचा आहे. थोड्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल असा हा निबंध आहे, तर चला सुरुवात सुरत करूया निबंध झाला आणि फुलपाखरू बनून लिहायला सुरुवात करू…

मी फुलपाखरू झालो तर मराठी निबंध – mi fulpakharu zalo tar marathi nibandh

मी शाळेत असताना फुलपाखरांच्या बद्दल माझ्या मनात खूप आकर्षण व कुतुहुल असायचे, भारतातील 15 टक्के फुलपाखरू हे महाराष्ट्र राज्यात मनसोक्तपणे वावरतात.

त्यात महाराष्ट्र राज्य हे भारत देशातील पहिले वहिले राज्य आहे, ज्याने स्वतःचे फुलपाखरु म्हणून मॉरमॉन म्हणजेच राणी पाकोळी जिचे शास्त्रीय भाषेतील नाव आहे पॅपिलीये पोलिम्नेस्टर यास राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे.

यामुळे मला फुलपाखरू या विषयात आवड निर्माण होऊ लागली, त्यात सर्वांचा आवडता विषय म्हणजे फुलपाखरू, कारण कोणत्याही बागेत गेले किंवा रानात वनात फिरायला गेलो, तर दिसणारे रंगबिरंगी फुलपाखरू सगळ्यांचे मन वेधून घेतात.

त्यामुळे फुलपाखरू हे सर्वांचे आवडते असते. म्हणून मला फुलपाखरू बनायला खूप आवडेल. छोटसं इवलसं दिसणारा फुलपाखरू हे मनसोक्त आवडेल त्या फुलांवर ती जाऊन बागडत असत.

आवडेल त्या फुलावरून स्वतःचं खाद्य खात असतो, त्याचे पंख हे खूप आकर्षक असतात. विविध रंगाचे फुलपाखरू हे एक आकर्षणाचा विषय बनलेला आहे. ज्याचं आयुष्य खूपच छोटसं असतं तरीही ते तेवढं आयुष्य मनसोक्त पणे जगत असत.

मी फुलपाखरू झालो तर, खरंच खूप सुखी होऊन जाईल, कारण आयुष्यात छोटसं मिळेल पण खूप छान आकर्षक मनमोहक मिळेल. जिथे सकाळी लवकर उठण्याची घाई नसेल, कामावर जाऊन पैसे कमावण्याची कटकट नसेल.

महत्त्वाच म्हणजे स्वतःचा हेतू साधण्यासाठी मैत्री करणाऱ्या, जवळ येणाऱ्या मित्रांपासून व नातेवाईक यांच्यापासून सुटका मिळेल. ह्या सिमेंटच्या ऊंच ऊंच इमारतीपासून, मोबाईल – टीव्ही, प्रदूषण करणाऱ्या गाड्या यांच्या पासून कुठेतरी दूर जाऊन, मी एखाद्या जंगलात वनामध्ये सुखाने राहील.

प्रदूषण हिंदी निबंध

मी फुलपाखरू झालो तर वाटेल तिकडे, आवडत्या जंगलामध्ये जाऊन मनसोक्तपणे माझ्या आवडत्या फुलांवर ती फिरेल. तेथील मकरंद मनसोक्त पिऊन टाकेल. मात्र फिरताना फुलपाखराला भीती नसते असं सुद्धा नाही.

कारण फुलपाखराचे असंख्य शत्रू आहेत, जसे की सरडा इतर कीटक सुद्धा फुलपाखराला भक्षक बनवतात. त्यामुळे मला सुद्धा त्यांची भीती नक्की वाटते. मात्र एका गोष्टीचे कुतुहूल नक्की वाटेल, काही शास्त्रज्ञ फुलपाखरावरच संशोधन करतात.

तर माझ्यावर संशोधन झालं तर ! तर मला नक्कीच आवडेल, ज्यामुळे फुलपाखरू व त्यांची जात – प्रजात ही जी लुप्त होत आहे, ती लुप्त न होता, जगामध्ये पुन्हा आनंदाने बागडेल व आपलं वर्चस्व स्थापन करेल.

कारण काही दुर्मिळ अशा फुलपाखरांच्या जाती – प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, कारण त्यास कारणीभूत हा मानव आहे. कारण मानवाने अनेक प्रकारे विज्ञानाच्या मदतीने जसं की मोबाईलचे टॉवर यामुळे किरणोत्सारी किरणे तयार होतात याचा फुलपाखरावर अति गंभीर परिणाम होतो.

मी फुलपाखरू झालो तर मला माझ्या आई-वडिलांना, मित्रांना, शिक्षकांना सोडून दुसऱ्या जगामध्ये जावे लागेल. दुसरे जग म्हणजे फुलपाखरांचे जग, निसर्गाच जग हे खरंच खूप छान असेल. कारण त्या ठिकाणी कोठेही भेट देण्यासाठी जाण्यासाठी मला लायसन्स पेट्रोल किंवा कोणाला विचारायची गरज पडणार नाही.

मी हवे तिकडे हवेच्या मार्फतीने मुक्त संचार करू शकतो, तिकडे माणसासारखी मतलबी माणसे नसतील. मी इतर फुलपाखरांना मी कसा आलो, कुठून आलो मी यापूर्वी कोण होतो या बद्दल सर्व माहिती सांगेन.

माझा आवडता खेळ

त्यांना मनुष्यप्राणी कसा चांगला आहे कसा वाईट आहे याबद्दल सुद्धा सांगेल तसेच त्यांनी केलेले संशोधन यांचे सुद्धा माहिती नक्की देईल. मी जर फुलपाखरू झालो तर अनेक फुलपाखरं सोबत ओळख करेल मित्र-मैत्रिणी तयार करेल.

त्यांच्यासोबत असंख्य खेळ खेळेल कधी या झाडावरून त्या झाडावर लपाछपी – पकडापकडी खेळ खेळेल. त्यांच्याकडे जे खेळ खेळले जातील ते खेळ मी त्यांच्यासोबत आवडीने खेळेल. मला पायाने चालण्याची काही गरज पडणार नाही मी माझ्या पंखांनी हवे तिकडे सैरभैर फिरेल, नवनवीन फुलांच्या मकरंद चाखेल.

कधी कधी आमच्या फुलपाखरू मित्र मंडळी यांची एकत्रितपणे जागतिक वारसा प्राप्त झालेल्या सहयाद्रीतील डोंगर रांगेत, कास पठारावरून, वन्यप्राणी अभयारण्य येथून फिरून येईल, तेथील नवनवीन फुलपाखरू बांधवाना त्यानिमित्ताने भेटता तरी येईल. खरच मी फुलपाखरू झालो तर खूप खूप मज्या करेल.

तर कसा वाटला मित्रांनो फुलपाखरू झालो तर निबंध, अजून कोणते निबंध हवे असतील नक्की सांगा. धन्यवाद

हा सुद्धा निबंध वाचा –

मी फुलपाखरू झालो तर भाग 02

तर मंडळी कसा वाटला हा निबंध नक्की सांगा. hitechmarathi धन्यवाद

1 thought on “मी फुलपाखरू झालो तर निबंध – mi fulpakharu zalo tar nibandh”

Leave a Comment